'उमेदवार बदलायला हवे होते, आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे फटका'- गिरीश महाजन
'उमेदवार बदलायला हवे होते, आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे फटका'- गिरीश महाजन
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचे निकालसमोर आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलनूसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे दाखवले जात आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आणि सांगितल्याप्रमाणे 'चारशे पार'चा आकडासुद्धा पार करणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. 

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. मात्र किमान 35 जागा महायुतीला मिळतील, उद्या तुम्हाला ते पाहायला मिळेल, असंही गिरीश महाजन यांनी सांगितले. राज्यात कमी जागा येत आहेत, हे खरं आहे. यामागील महत्वाचं कारण म्हणजे वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षणाचा प्रश्न असल्याचं गिरीश महाजन म्हणाले.

काही ठिकाणी उमेदवार बदलायला पाहिजे होते, ते मात्र झालं नाही, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी होत असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितले. गिरीश महाजनांच्या या विधानमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group