ठरलं! चंपाई सोरेन 'या' तारखेला भाजपात प्रवेश करणार
ठरलं! चंपाई सोरेन 'या' तारखेला भाजपात प्रवेश करणार
img
Dipali Ghadwaje
झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदावरून अपमानास्पद पद्धतीने दूर केल्याची खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर ते पक्षातून बाहेर पडून स्वत:चा पक्ष काढतील किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

दरम्यान, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. चंपाई सोरेन हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत चंपई सोरेन यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री तसेच आदिवासी समाजाचे नेते चंपाई  सोरेन यांनी नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. चंपाई सोरेन हे ३० ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करतील. रांची येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल, असं हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

चंपाई सोरेन यांच्या या निर्णयानंतर आता झारखंडच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. चंपाई हे हेमंत सोरेन यांचे वडील शिबू यांचे निकटवर्तीय मानले जातात. बिहारमधून झारखंड वेगळे राज्य निर्माण करण्यात आले. या चळवळीत चंपई सोरेन सक्रिय होते.

आता वयपरत्वे शिबू सक्रिय राजकारणात नाहीत. झारखंड मुक्ती मोर्चाची सूत्रे हेमंत यांच्या हाती आहेत. पक्षाचे नेतृत्व हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा चंपाई  यांचा आक्षेप आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group