शिवबंधन बांधताच माजी आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले  भाजपने मला....
शिवबंधन बांधताच माजी आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले भाजपने मला....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आज गोंदियाचे  माजी आमदार आणि भाजपचे नेते  रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर, भाजपने मला 2018 पासून बेवकूफ बनवलं  अशी प्रतिक्रिया रमेश कुथे यांनी माध्यमांना दिली. तर, मी पक्षातच होतो,फक्त शिकण्यासाठी तिकडे गेलो होतो, असेही त्यांनी म्हटले. 

शिवबंधन बांधताच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने मला बेवकूफ बनवलं, फेब्रुवारी 2024 मध्ये बावनकुळे नागपूरला आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की, आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे. 100 जण आपल्याकडे येतील आणि 5 जण जातील, त्याने आपल्याला फरक पडत नाही, त्याच दिवशी कळलं की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवलं, अशा शब्दात रमेश कुथे यांनी भाजप व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शिवसेना प्रवेशानंतर टीका केली आहे.  

हे ही वाचा >>>> लाडक्या बहि‍णींना राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीला सुरुवात....

 कोण आहेत रमेश कुथे
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group