भाजपच्या आठवी पास माजी आमदाराने केले पदवीधर मतदारसंघात मतदान... कोण आहे
भाजपच्या आठवी पास माजी आमदाराने केले पदवीधर मतदारसंघात मतदान... कोण आहे "हे" आमदार ?
img
Jayshri Rajesh
मिरा भाईंदरचे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या फेसबुकच्या त्या पोस्टवरुन सध्या मिरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. बुधवारी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी नरेंद्र मेहता यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर आपल्या पत्नीसमवेत हाताच्या बोटाची शाई दाखवत एक फोटो पोस्ट केला होता. मतदान करा, मतदान करणे गरजेच आहे.

 कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२४ साठी आम्ही आपलं मतदान केलं आहे. मतदानाचं कर्तव्य पूर्ण करुन, लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही योगदान दिलं आहे. आपणही मतदान करुन योग्य उमेदवार निवडा, अशा आशयाची पोस्ट नरेंद्र मेहता यांनी केली होती. 

नरेंद्र मेहता यांनी बोटाला शाई लावलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोमुळे आता पुन्हा एकदा भाजपची मतदान केंद्रावरची बाब समोर आली आहे.

नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या निवडणूकीच्या प्रतिज्ञा पत्रात ते आठवी पास असल्याचे लिहिले होते. बुधवारी पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघात नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या पत्नीसह मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत ते शाई लावलेलं बोट दाखवताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर प्रतिक्रीया देताना नेटकऱ्यांनी आठवी पास व्यक्ती पदवीधर मतदारसंघात कशी काय मतदान करू शकते असा सवाल केला आहे.

मेहता यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना आपण मतदान केले नसून फक्त पत्नीसोबत फोटो काढल्याचे म्हटले आहे. "माझ्या पत्नीने याठिकाणी मतदान केले आहे. मी तिच्यासोबत तिथे गेलो होतो. त्यावेळी फोटोग्राफर्सने आम्हाला फोटोसाठी विनंती केली. त्यामुळे आम्ही दोघांनी पोझ दिली. मात्र मी मतदान केल्याचे कुठेही म्हटलेले नाही', असे मेहता म्हणाले. मात्र नेटकऱ्यांनी मतदान केले नाही तर बोटाला शाई कशी असा सवाल त्यांना केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group