एकनाथ शिंदेंचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याला शिवसेनेत घेतलं
एकनाथ शिंदेंचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याला शिवसेनेत घेतलं
img
DB
विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी राज्यात राजकीय नेत्यांनी आतापासून मतदारसंघातील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपलाच मोठा धक्का दिलाय. मराठवाड्यातील भाजपचे विश्वासू नेते तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. सुधीर पाटील यांचा धाराशिवमध्ये तगडा जनसंपर्क आहे. 

त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधीर पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुधीर पाटील हे आधी शिवसेनेतच होते. त्यांनी धाराशिव आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून धुरा सांभाळली होती.

मात्र, त्यानंतर 2017 मध्ये सुधीर पाटील यांनी धनुष्यबाण सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. आता सुधीर पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

यासाठी त्यांनी भाजपकडे विधानसभेची मागणी देखील केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी फारसा प्रतिसाद दिल्याने सुधीर पाटील नाराज झाले होते. याच नाराजीतून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे सुधीर पाटील यांना कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group