भीषण अपघात : एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
भीषण अपघात : एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
सांगलीतील तासगाव :  मणेराजुरी मार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. एक कार कॅनॉल मध्ये पडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचणी जवळ मध्यरात्री ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून हा भीषण अपघात झाला. मात्र आज सकाळी हे प्रकरण उघडकीस आला.

चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. त्यामध्ये पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल पूर्णपणे कोरडा होता. त्यामुळे भरधाव वेगात आलेली ही कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.

या दुर्घटनेत मृत झालेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते. मृतांमध्ये तीन मुले,एक पुरुष,दोन महिलांचा समावेश असून सर्वजण तासगावचेच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हा दुर्दैवी अपघात घडला तेव्हा कारमध्ये सात जण होते. ते कवठेमंकाळ येथील कोकळे येथील वाढदिवसाचा एक कार्यक्रम आटोपून तासगावच्या दिशेने परत जात होते. मात्र एस.एस. मंगल कार्यालयाजवळ असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार थेट कॅनॉलमध्ये कोसळली. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनीदेखील तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group