सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमावरून घराच्या दिशेने जात असताना संभाजी भिडे गुरुजींवर अचानक कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार , सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली.