कुत्रा आणि मांजर चावल्याने एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारतीत घडलीय.
मिळालेल्या माहितीनुसार , शुभम मनोज चौधरी (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. एक भटका कुत्रा चावला त्यानंतर काही दिवसांनी मांजर त्याला चावली होती. मात्र या तरुणाने उपचार घेतले नाही.
त्यानंतर मग त्याला तीन दिवसापूर्वी त्रास जाणवू लागला. मग त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्नासह आता भटक्या मांजरींचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय.