सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कुमठे गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. येथील पाटील कुटुंबात अवघ्या काही तासांच्या अंतराने दोघांचे निधन झाल्याने कुटुंबावर डोंगर कोसळला आहे तर परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे.
पैलवान अविनाश महादेव पाटील ( ५४ वर्ष ) आणि त्यांच्या आई सुधाताई महादेव पाटील ( ७५ वर्ष ) यांचे एकाच दिवशी अवघ्या काही तासांच्या अंतराने निधन झाले. कुमठे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकजवळ वास्तव्यास असलेल्या पाटील कुटुंबावर मंगळवारी पहाटे पहिला आघात झाला.
हे ही वाचा !
युवा पिढीतील नावाजलेले पैलवान अविनाश पाटील यांचे दीर्घ आजाराने पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 7.30 वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंब आणि गावकरी या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच सकाळी 11 वाजता दुसरा आघात झाला. अविनाश यांच्या आई सुधाताई पाटील यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले. यामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.