शाळेच्या संस्थाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यापूर्वीही संस्थाचालकांच्या मुजोरपणामुळे एका पालकाचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच सांगलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील कवठेमहांकाळ जत रस्त्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पालकांच्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या गलथान कारभाराबद्दल तक्रार केली होती याचा राग मनात धरून संस्थाचालक यांनी मुलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुलांनी आपल्या पालकांना शाळेमध्ये जे खाद्य दिलं जातं अन्न दिलं जातं त्यामध्ये किडे अळ्या असे प्रकार होत असून शाळेच्या आवारात दुर्गंधी अस्वच्छता असल्याची तक्रार मुलांनी दिली होती.
मुलांच्या तक्रारीनंतर पालकांनी शाळा प्रशासनाच्या संस्थाचालकांना मीटिंगमध्ये सर्व बाबी आढळून दिल्यानंतर तोच राग मनात धरून संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाणीची घटना घडली आहे.
जवळपास 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेच्या गलथान कारभाराबद्दल तक्रार केली आहे. या घटनेनंतर पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून संस्था चालकावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.