अखेर भाकरी फिरली ! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडलं,  'या' मोठ्या नेत्याच्या हाती धुरा
अखेर भाकरी फिरली ! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडलं, 'या' मोठ्या नेत्याच्या हाती धुरा
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. 
जयंत पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी करत होते. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापददिनाच्या कार्यक्रमात देखील भाषण करताना त्यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा असे बोलून दाखवले होते. त्यावेळी साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं देखील जयंत पाटील यांनी सांगितले होते.

'पवारसाहेबांनी मला बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालवधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे.', असे म्हणत त्यांनी शरद पवार यांचे आभार देखील मानले होते. जयंत पाटील यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू होती. अखेर शरद पवार यांनी निर्णय घेतलाच. जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. 

'या' मोठ्या नेत्याच्या हाती धुरा

अखेर राष्ट्रवादीत भाकरी फिरली आहे. आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदी निवड करण्यात आली आहे. १५ जुलै रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक देखील होणार आहे. याच बैठकीत शशिकांत शिंदे प्रदेशाध्यपद स्वीकारणार आहेत. शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आणि मुख्य प्रतोद आहेत. १८ फेब्रुवारी २०२४ पासून जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होते.


इतर बातम्या
Join Whatsapp Group