धर्मरावबाबा आत्राम यांचा खळबळजनक दावा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
धर्मरावबाबा आत्राम यांचा खळबळजनक दावा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट कायमच संख्याबळाचा दावा करत आहेत. यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर आज अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जयंत पाटील हेच अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तसेच अजित पवार गटातील आमदारांचा आकडा 53 वर पोहचणार असल्याचा दावा आत्राम यांनी केला आहे. आत्राम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 

दरम्यान धर्मरावबाबा आत्राम  म्हणाले, शरद पवार गटाचे जे नेते दावा करत फिरत आहे की आमच्या संपर्कात अजित पवार गटाचे 15 आमदार आहे. मात्र दावा करणारेच जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात आहे. आमच्या गटाच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. दर मंगळवारी अजित पवार हे आमदाराची बैठक घेतात. त्याच्या समस्या, मतदार संघातले ऐकून घेतात. हे आधी होत नव्हतं म्हणून सर्व आमदारांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. 

त्यामुळे सर्व आमदार अजित पवार गटात येऊन खूश आहेत. दरम्यान शरद पवार गटाचे उरलेले आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच आमच्या आमदारांचा आकडा हा 53 वर पोहचणार  आहे.  आमची लोकसभेची मिशन 45 ची तयारी सुरु झाली असून मी गडचिरोली लोकसभा मतदार संघात लढायला इच्छुक असून त्या तयारीच्या कामाला देखील लागल्याचे आत्राम यांनी सांगितले.

त्यामुळे आता धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्यानंतर शरद पवार गट आणि जयंत पाटलांकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group