जयंत पाटीलही अजित पवारांच्या वाटेवर?  सांगलीच्या खासदाराच्या विधानाने चर्चांना उधाण
जयंत पाटीलही अजित पवारांच्या वाटेवर? सांगलीच्या खासदाराच्या विधानाने चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच जयंत पाटीलांचा लवकरच भाजपात प्रवेश करतील असा खळबळजनक दावा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं भाकीत भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केलंय. भाजप होकायंत्राचा तसाच इशारा आहे असा टोला त्यांनी मारला. सांगली मनपा क्षेत्रातले जयंत पाटील गटाचे पदाधिकारी अजित दादांच्या गटात गेलेत. त्यामुळे जयंत पाटील आता कुठे जाणार असा सवाल त्यांनी केला. मिरजमध्ये झालेल्या या कार्यक्रमात भाजपमंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपचे नगरसेवकही उपस्थित होते.

"भाजपच्या होकायंत्राचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया... असे सुचक वक्तव्य खासदार संजयकाका पाटील  यांनी सूचक वक्तव्य केले आहे. संजय काका पाटील यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंती पाटील कुठे जाणार ? अशा चर्चा सुरू आहेत. यावरून संजयकाका पाटील यांनी "जयंत पाटील आता कुठे जाणार ? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांचा भाजपा प्रवेश होईल," असे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group