मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर खुनाचा गुन्हा दाखल , मुलगाही अटकेत ; नेमकं  प्रकरण काय?
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर खुनाचा गुन्हा दाखल , मुलगाही अटकेत ; नेमकं प्रकरण काय?
img
Dipali Ghadwaje
सोलापूर : पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी जखमी झालेल्या वैभव श्रावण वाघे (वय ४३) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा बझार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथे घडली होती. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला आणि सोलापूर पोलिसांनी ताबडतोब या नेत्याला आणि त्याच्या मुलांना अटक केल्याने सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार , सीमा विलास गायकवाड (वय ३५, रा. सिब्दार्थ हौसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद रामचंद्र गायकवाड, प्रसेनजीत ऊर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजीत ऊर्फ विकी प्रमोद गायकवाड, पुतण्या सोन्या ऊर्फ संजय देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश व सनी निकंबे (सर्व रा. सिब्दार्थ हौसिंग सोसावटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 

वैभव वाघे जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत

सीमा यांच्या घराशेजारी राहणारे शिरसे आणि शिवशरण यांच्यासोबत पूर्वी भांडण झाल्याचा राग मनात धरून संशयित आरोपी सनी निकंबे आणि प्रमोद गायकवाड यांनी दारू पिऊन अंगावर येऊन आदित्य दावणे याला पट्ट्याने मारून भांडण सुरू केले. त्यानंतर सीमा आणि त्यांची मुले सुमित आणि रितेश गायकवाड यांना, तसंच भांडण सोडवण्यासाठी आलेले नीलेश शिरसे, सागर शिरसे, वैभव वाघे यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसंच वैभव वाघे वाला गंभीर दुखापत केली होती. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू  झाला.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मारहाणीत जखमी तरुणाचा उपचार घेताना मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ताबडतोब मोठा पोलीस फौजफाटा सिद्धार्थ हौसिंग सोसायटीत तैनात केला होता. सोमवारी सायंकाळी पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांना आश्वासन दिलं. संशयीत आरोपी प्रमोद गायकवाड यांच्यासह प्रसेनजीत, हर्षजीत, मनोज अंकुश यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत आहे. अधिक तपास फौजदार पाटील हे करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group