मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
उद्या (15 डिसेंबर) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल. उद्या राज्यमंत्री मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्र सिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10. माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी :
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराजे देसाई
4. गुलाबराव पाटील
5. दादा भुसे
6. प्रताप सरनाईक
7. संजय शिरसाठ
8. भरत गोगावले
9. आशिष जयस्वाल
10. योगेश कदम
11. विजय शिवतारे
12. आबिटकर किंवा यड्रावकर
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे
राज्यमंत्री
1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक