शरद पवार, अजितदादा पुन्हा एकत्र येणार? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच मोठं वक्तव्य
शरद पवार, अजितदादा पुन्हा एकत्र येणार? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच मोठं वक्तव्य
img
Dipali Ghadwaje
गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस होता. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप समोर आलेलं नाही.

मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.  यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अंकुश काकडे? 

अजितदादांनी गुरुवारी पवार साहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे.  पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे, दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे. तसेच झाल्यास आनंदाची गोष्ट असेल, असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पण याचा अंतिम निर्णय पवार साहेब घेतील. पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण राहणार नाही. पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group