धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? भाजपसोबत गेलं पाहिजे का? शरद पवार स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? भाजपसोबत गेलं पाहिजे का? शरद पवार स्पष्टच बोलले
img
Dipali Ghadwaje
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

याप्रकरणी वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहेत. त्यातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि धनंजय मुंडे राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संतोष देशमुख हत्येप्रकरणी विचारणा करण्यात आली. तसेच धनंजय मुंडेंनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे. या प्रकरणी शरद पवारांनी त्यांचे मत व्यक्त केले.

संपूर्ण प्रकरणच चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने हत्या केली. त्यामागचे कोण लोक आहेत याची चर्चा आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मी पहिल्यांदा भेटायला मीच गेलो होतो. परभणीतही मीच पहिला गेलो होतो. लोकांची प्रतिक्रिया चीड आहे. त्या ठिकाणी सामाजिक तणाव निर्माण होईल असं दिसत होतं.

त्यामुळे यातून मार्ग काढण्याची बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. या ठिकाणी राजकारण येऊ नये आणि समाजात एकवाक्यता राहावी ही भूमिका मांडली. दुर्देवाने काही ना काही घडतंय. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. आमचा दृष्टीकोण सामंजस्य निर्माण करणारा आहे, असे शरद पवार म्हणाले.

माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात चर्चा काय आहे, याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. याप्रकरणाची अधिक माहिती गृहखात्याकडे असली पाहिजे. वस्तुस्थिती पाहून राज्यकर्त्यांनी वातावरण निवळण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल केली.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group