जितेंद्र शेळकें यांचा अपघात की घातपात ? , ब्रेक फेल झाले की केले ? अमोल मिटकरींचा सवाल
जितेंद्र शेळकें यांचा अपघात की घातपात ? , ब्रेक फेल झाले की केले ? अमोल मिटकरींचा सवाल
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार कंटेनरखाली घुसली. या अपघातात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर रोहित पवार , अमोल मिटकरी आणि सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 



जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. 

अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का?, कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहलं नाही. गेल्या 3 महिन्यापासून अजित दादांच्या अपघातापूर्वीचे CCTV फुटेज समोर येऊ शकले नाही, त्यामुळे जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात? या मागील खरं सत्य महाराष्ट्र समोर येणारचं नाही, अशीही खंत आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली. 

जितेंद्र शेळके यांची दोन दिवसापूर्वी चौकशी होते, आज चौकशीच्या भोवऱ्यात असलेल्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू दाखवल्या गेलं? याचं खरं सत्य कधी समोर येणार, याबाबत आता मनात मोठी शंका असल्यासं मिटकरी यांनी म्हटलं. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group