मोठी बातमी ! अभिजीत दीपकेंच्या जवळच्या व्यक्तीचे निधन; घरात शोक
मोठी बातमी ! अभिजीत दीपकेंच्या जवळच्या व्यक्तीचे निधन; घरात शोक
img
Nandini khandare More

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके हे दिल्लीत आंदोलनासाठी आले असता त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आलं आहे. अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या आईचं निधन झालं आहे. अभिजीत यांची आजी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यांचं वयही झालं होतं. आजारपणामुळे आज त्यांचं निधनं झालं. त्यामुळे दीपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपके यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता या छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र, आजीचं निधन झाल्याने अभिजीत दीपके यांचे आईवडील तातडीने हिंगोलीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group