अभिजीत दीपके, सौरव दास अन् आशुतोष रांका यांना अटक होणार? ट्विटने खळबळ
अभिजीत दीपके, सौरव दास अन् आशुतोष रांका यांना अटक होणार? ट्विटने खळबळ
img
Nandini khandare More
सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीचा सर्वत्र चर्चेचा विषय असून नीट परिक्षा फुटीप्रकरणात धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. असे असतानाच सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका  यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. अभिजीत दीपके, सौरव दास आणि मला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, त्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. असा खळबळजनक दावा आशुतोष रांका केला आहे. आशुतोष रांका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विट एक्स अकाऊंटवर केले आहे. अनेक लोकांनी कळवले आहे की, अभिजीत दीपके, सौरव दास आणि मला 10 तारखेपूर्वी कधीही NSA कायद्यांखाली अटक होऊ शकते. आम्ही तिघेही 6 जूनपासून तुरुंगात जायला तयार आहोत. आम्हाला त्याची अजिबात भीती नाही. असे सौरव दास यांनी ट्विटमध्ये म्हटले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group