पावसाचा कहर वाढणार! पुढील ८ तास धोक्याचे; १३ राज्यांना अलर्ट जारी
पावसाचा कहर वाढणार! पुढील ८ तास धोक्याचे; १३ राज्यांना अलर्ट जारी
img
Nandini khandare More
देशातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असून, पावसाबाबत महत्त्वाचा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पुढील ८ तासांत काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, एकूण १३ राज्यांना अलर्ट जारी केल्याचे वृत्त आहे.

भारतीय हवामान विभागाने आज १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसासोबतच ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

१३ राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील भागांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रासह अंदमान-निकोबार बेटे आणि ईशान्य भारतातील नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो.

डोंगराळ भागांत थंडीची चाहूल एकीकडे देशाच्या विविध भागांत पावसाचे वातावरण असताना, दुसरीकडे डोंगराळ राज्यांमध्ये हवामानात बदल जाणवू लागला आहे. उंचावरील प्रदेशांमध्ये तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, पावसामुळे काही डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे डोंगराळ रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा समुद्रातील हवामान आणि लाटांची स्थिती लक्षात घेऊन केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टी परिसरातील मच्छीमारांसाठीही हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढण्याची आणि परिस्थिती प्रतिकूल होण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाच्या सूचना तपासाव्यात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group