पुढील तीन तासांत 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
पुढील तीन तासांत 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
img
Dipali Ghadwaje
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. तर काही भागामध्ये उष्णतेचा कहर दिसून येत आहे. दरम्यान पुढील तीन तासांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
 
मराठवाडा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वादळी पावसाचा इशारा  

धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली. तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group