माझ्या पप्पाच्या जीवाला काही झालं तर सरकारला जागेवर ठेवणार नाही : पल्लवी जरांगे
माझ्या पप्पाच्या जीवाला काही झालं तर सरकारला जागेवर ठेवणार नाही : पल्लवी जरांगे
img
Dipali Ghadwaje
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवला आहे. हजारो कार्यकर्त्यांसह ते २६ जानेवारीला मुंबईला पोहचणार आहे.त्यांची आंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान "माझ्या पप्पाच्या जीवाला काही झालं तर आई जिजाऊची शपथ घेउन सांगते, या सरकारला जागेवर ठेवणार नाही", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सोलापूर- धुळे महामार्गावरील अंकुशनगर येथे आली असता पत्नी सोमित्रा जरांगे, मुलगी पल्लवी जरांगे यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पत्नी, मुलीसह मुलगा शिवराज यांनाही आश्रू अनावर झाले होतेे. सात महिन्यानंतर या पदयात्रेत जरांगे यांचे कुटुंब एका ठिकाणी दिसून आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना पल्लवी जरांगे म्हणाली, मराठा आरक्षणासाठी माझे वडील मागील सात महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. तरीही निर्दयी सरकारने मागण्या मान्य केलेल्या नाहीत. सात महिन्यांपासून वडिल आमच्या कुटुंबासोबत नाहीत. सरकारने अनेक आश्वासने दिली आणि मुंबईला जाण्याची वेळ आणली. 

यावेळी शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, माझ्या पप्पांच्या जिवाला काही झालं तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही, असा इशाराही डबडबत्या आश्रूंनी पल्लवी जरांगे हिने सरकारला दिला. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत पुढे काय निर्णय घेतला जातो ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group