५० हजारांचे कर्ज न फेडल्याने ठेकेदाराने ७ वर्षीय मुलाला घरकामास ठेवले
५० हजारांचे कर्ज न फेडल्याने ठेकेदाराने ७ वर्षीय मुलाला घरकामास ठेवले
img
दैनिक भ्रमर
भोपाळ (भ्रमर वृत्तसेवा) :- केवळ 50 हजार रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने सात वर्षांच्या मुलाला घरकामाला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल येथे ही घटना घडली.

मोलमजुरी करणार्‍या गंजू उईके यांनी ठेकेदाराकडून 6 वर्षांपूर्वी 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. पण ते फेडता न आल्याने ठेकेदाराने त्यांच्या 7 वर्षांच्या मुलाला घरकाम आणि जनावरे राखण्यासाठी ठेवून घेतले होते. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलाची सुटका करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सन 2019 मध्ये हरदा जिल्ह्यातील झिरीखेडा गावात गंजू उईके आणि त्यांची पत्नी सरिता हे मोलमजुरी करायचे. त्यावेळी त्यांनी कंत्राटदाराकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कंत्राटदार रुपेश शर्माने कर्ज फेडण्यासाठी गंजू उईकेच्या गोविंद (वय 7) या मुलास स्वत:च्या घरात कामासाठी ठेवले. त्याला जनावरे चारण्यासाठी आणि घरातील कामे करायला तो सांगत होता.

आई-वडिलांनी अनेकदा मुलाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हरदा येथे भेटीसाठी गेले असताना मुलाला भेटू दिले नाही. ही बाब साहस संस्थेच्या कार्यकत्यार्र् पल्लवी ठकराकर यांना समजली. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना याची माहिती देत थेट पोलिसांच्या मदतीने त्या मुलाची सुटका केली.

पोलीस जेव्हा गोविंदच्या सुटकेसाठी गेले तेव्हा कंत्राटदाराचा भाऊ मुकेश शर्माने मुलाला शेतात लपवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या पथकाने त्याला सुखरुप वाचवले. यावेळी त्यांच्यात वाद झाले. या प्रकरणी कंत्राटदार रुपेश शर्मावर बाल कामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई-वडिलांकडे ओळख पटविण्याची कागदपत्रे नसल्याने मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यास अडचण होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कागदपत्रे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
bhopal |
इतर बातम्या
Join Whatsapp Group