पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. खासगी गाडीवर लाल दिवा आणि वरिष्ठांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीय. त्यांनी आपल्या खासगी आलीशान गाडीला अंबर दिवा लावलाय. त्यावर महाराष्ट्र शासन लिहिलेली पाटीदेखील लावलीय. IAS अधिकारी पूजा खेडकर असे यांचे नाव आहे. त्यामुळे सध्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आली आहे.
IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी आपल्या ट्रेनीच्या कार्यकाळात खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या पुण्यात ट्रेनिंग घेत होत्या.
दरम्यान त्यांच्याविरोधात लेखी तक्रार गेल्यानंतर त्यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावणे तसेच खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
पुजा खेडकर या पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. पण आता त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने त्या राज्यभरात चर्चेत आल्या आहेत.
यापुढे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांना सेवा करावी लागणार आहे. नियमानुसार कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला 2 वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते.
त्यानुसार IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र आता याच खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला आहे.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
खेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले तसेच खासगी गाडीवर अंबर दिवा लावत त्यावर महाराष्ट्र शासन लिहिले. अशा कारणांमुळे त्यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी दिवसे यांनी केली. तसेच पूजा यांच्या वडिलांची वर्तवणूकीवरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यांची वर्तणूक चुकीची असल्याचे म्हणत व्हॉट्सअप चॅटचे फोटोदेखील दिवसे यांनी जोडले आहेत.
कोण आहे पुजा खेडकर?
पुजा या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत.