पूजा खेडकर यांनी तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून यूपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलं आहे. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेसाठी त्यांचं नाव लिहिताना सातवेळा फेरफार केल्याचं उघडकीस आलं आहे. इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांनी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आले आहे.
पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला आहे. पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत असल्यानं आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर यांनी जेव्हा पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा त्यांनी आपलं नाव खेडकर पूजा दिलीपराव असं लिहीलं होतं. दुसऱ्या वेळेला त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख पूजा दिलीप खेडकर असा केला. तर काही ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख पूजा मनोरमा दिलीप खेडकर असा देखील आढळून आला आहे.