राज्य सरकारने आशा स्वयंसेविकासाठी  घेतला ''हा'' मोठा निर्णय, मिळणार ''इतके'' लाख रुपये
राज्य सरकारने आशा स्वयंसेविकासाठी घेतला ''हा'' मोठा निर्णय, मिळणार ''इतके'' लाख रुपये
img
दैनिक भ्रमर
विधानसभेच्या पार्श्ववभूमीवर राज्य सरकारने  आशा स्वयंसेविकासाठी  मोठा निर्णय घेतला आहे . आशा स्वयंसेविका  व गटप्रवर्तकांच्या कर्तव्य बजावत असतानाअपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास त्यांना 5 लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार असल्याची घोषणा केली.   याबाबत नुकतंच सार्वजनिक आरोग्य विभागाने जीआर काढला आहे. 

हा निर्णय 01 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार असल्याची देखील माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.  दरम्यान, सरकारने या निर्णयासाठी प्रति वर्ष अंदाजित 1.05 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. तसेच राज्य सरकारने यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास देखील मान्यता दिली आहे

राज्यात दररोज आशा स्वयंसेविकांना माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने आशासेविकांसाठी मोठा निर्णय घेत आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ केली होती
इतर बातम्या
Join Whatsapp Group