अंगणवाडी सेविका  ४ डिसेंबरपासून संपावर.....
अंगणवाडी सेविका ४ डिसेंबरपासून संपावर.....
img
Dipali Ghadwaje
कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याची नोटीस जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उममुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्याकडे देण्यात आली. महावीर गार्डनपासून या मोर्चाला सुरुवात झाली.

दरम्यान ‘कोण म्हणंतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आवाज दो, हम सब एक है’, ‘कांदा म्हटला बटाट्याला, लाज नाही सरकारला’ अशा घोषणा देत कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

नेमक्या काय आहेत मागण्या

अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन द्या, मदतनिसांना २० हजार रुपये मानधन सुरू करा, महागाई निर्देशांकाला जोडून सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा, विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव महिला व बालविकासमंत्र्यांनी मान्य केला आहे. तो नाेव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून हिवाळी अधिवेशनात मंजूर करा, महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी ५ ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करा, आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६, तर कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या; पण या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. 

इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना भरघोस व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ का? सरकार नेहमीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देत आहे. 

त्यामुळेच ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या मोर्चात दीड हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच मासिक बैठकीवर बहिष्कार संपाच्या आधी नोव्हेंबरमधील मासिक प्रगती अहवाल, मासिक बैठक व इतर कोणतीही माहिती देण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे युनियने सांगितले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group