शिंदेंचा ठाकरेंना धक्का : २ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने साथ सोडली , शिंदे गटात प्रवेश
शिंदेंचा ठाकरेंना धक्का : २ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने साथ सोडली , शिंदे गटात प्रवेश
img
Dipali Ghadwaje
अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडले आहे. दोन वेळा आमदार राहिलेले ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. धाने पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धाने पाटील यांच्या या निर्णायामुळे अमरावतीचे राजकरण फिरले आहे.

 उबाठाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील हे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धाने पाटील याच्यासोबत त्याचा मुलगा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील याच्यासह शेकडो कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये ठाकरेंची ताकद खूपच कमी झाली आहे.

या आधी संजय बंड आणि त्यांची पत्नी प्रिया बंड यानीही उबाठाची साथ सोडली होती. बडनेराचे 2 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आणि त्यांचा मुलगा अमरावती युवासेना जिल्हा प्रमुख श्याम धाने पाटील आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या  शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group