इस्रायलने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर जोरदार हवाई हल्ले करत संपूर्ण परिसर हादरवून सोडला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा, इस्रायली लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा इराणच्या अणुउद्योग स्थळांवर आणि लष्करी तळांवर हल्ला चढवला. या आक्रमणात इराणचे प्रचंड नुकसान झाले असून, ७८ लोकांचा मृत्यू, तर ३५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. आधी इस्त्रायलने हल्ला करत इराणची अणुस्थळे उद्धवस्त केली होती.
त्यानंतर इराणने प्रत्युत्तर दिलं. इराणने इस्त्रायलच्या दिशेनं १५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यापैकी ६ क्षेपणास्त्रे थेट तेल अवीवमध्ये कोसळली.
या हल्ल्यात १ महिला ठार, तर ६३ लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्या दरम्यान, , इस्रायली संरक्षण मंत्रालयालाही लक्ष्य करण्यात आलं होतं.
इराणकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळी ५:३० वाजला इस्त्रायलने इराणी अणुस्थळे आणि अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. यामध्ये ६ अणुशास्त्रज्ञ आणि २० हून अधिक लष्करी कमांडर ठार झाले.
२४ तासांत घडलेल्या ७ महत्त्वाच्या घडामोडी :
१. इस्त्रायलने २०० लढाऊ विमानांनी अनेक इराणी लक्ष्यांवर हल्ला केला.
२. इस्त्रायलने त्याला ऑपरेशन रायझिंग लायन असे नाव दिले.
३. इस्त्रायली कारवाईत ६ इराणी शास्त्रज्ञ आणि २० लष्करी कमांडर मारले गेले.
४. इराणने प्रत्युत्तर देताना हल्ल्यास "ट्रू प्रॉमिस थ्री" असे नाव दिले. यात १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली.
५. इराणने इस्त्रायली सरंक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे.
६. नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोंदीशी बोलून परिस्थितीची माहिती दिली.
७. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. "अणुकरार न केला तर मोठा हल्ला होईल."