राजकीय : शरद पवार यांचे मनपा निवडणुकांबद्दल मोठं विधान ; नेमकं काय म्हणाले?
राजकीय : शरद पवार यांचे मनपा निवडणुकांबद्दल मोठं विधान ; नेमकं काय म्हणाले?
img
Dipali Ghadwaje
अनेकदा चर्चा होते की आपण सर्वांना सोबत घेतलं पाहीजे. मात्र, सर्वांना म्हणजे कुणाला? जे शिव, शाहू फुले आंबेडकरांना मानतात. यशवंतराव चव्हाण यांना मानतात त्या लोकांना आपण सोबत नक्की घेऊ. मात्र, संधीसाधू भाजपसोबत कदापीही युती होऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण भाजपसोबत जोरदार लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते पिंपरी चिंचवड येथे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

तसंच, यावेळी शरद पवार यांनी १९८० ची घटनाही सांगितली. ते म्हणाले,  त्यावेळी राष्ट्रवादीचे ७० आमदार निवडून आले. ते मोठ यश होत.

त्याच दरम्यान, मी काही कामानिमीत्त १० दिवसांसाठी बाहेर गेलो होतो. त्या दहा दिवसांत माग चमत्कार घडला आणि पक्षाचे निवडणून आलेल्या ७० आमदारांमधून ६४ आमदार पक्षाला सोडून गेले.

त्यावेळी कार्यकर्त्यांचे कष्ट, जनतेने ठेवलेला विश्वास हे सगळ विसरून त्यांनी हे पाऊल उचललं होत. मात्र, मी या घटनेने खचलो नाही. लोकांशी संपर्क वाढवला. पक्षात अधिक लक्ष दिलं. नवे कार्यकर्ते उभा राहिले.

त्यानंतर ५ वर्षांनी निवडणूक झाली आणि जे सोडून गेले त्यातील ९० टक्के लोक पराभूत झाले होते. त्यामुळं असे संकट येत असतात त्याला न घाबरता पुढं जायच असंत असंही पवार यावेळी म्हणाले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group