पुणे : राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर काही पक्षांमध्ये पक्षप्रवेशही सुरु झाले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील अजित पवार गटातील काही माजी नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
त्यानंतर आता अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचर्चेदरम्यान, त्यांनी मोठं विधान केलं आहे. 'विधानसभेआधीच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, असा दावा बेनके यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.