हृदयद्रावक ! मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खासगी बँकेसमोरच घेतला गळफास
हृदयद्रावक ! मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खासगी बँकेसमोरच घेतला गळफास
img
Dipali Ghadwaje
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  जिल्ह्यातील गेवराई शहरात मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खासगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केली आहे. गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली.

याबाबत मिळालेल्या महितीनुसार , सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. सुरेश जाधव यांची ११ लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात नसल्याने जाधव यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

जाधव यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिासांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

रक्कम किती होती आणि याबाबतची इतर संपूर्ण माहिती घेऊन रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे. या प्रकारानंतर गेवराईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group