काय सांगता...! आता थेट अंतराळातून मिळणार औषधं ; अमेरिकी कंपनीचे खास मिशन होणार लाँच
काय सांगता...! आता थेट अंतराळातून मिळणार औषधं ; अमेरिकी कंपनीचे खास मिशन होणार लाँच
img
Dipali Ghadwaje
आता तो दिवस दूर नाही ज्यावेळी तुमची औषधे फॅक्टरीमधून नाही तर थेट अंतराळातून  येतील. काय तुमचा विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे. अमेरिकेतील Varda Space Industries या खासगी कंपनीने हा कारनामा करून दाखवला आहे.

कंपनीचे चौथे मिशन W 4 उद्या म्हणजेच 21 जून रोजी SpaceX रॉकेटसह लाँच होणार आहे. अंतराळात औषधे तयार करणे आणि ही औषधे पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे.

मिशनमध्ये काय खास
वर्दा कंपनी एका खास प्रक्रियेसह अंतराळात औषधे तयार करणार आहे. या प्रक्रियेला सोल्युशन बेस्ड क्रिस्टलायझेशन असे म्हणतात. यामध्ये एखाद्या औषधाला घोटून क्रिस्टलच्या रूपात गोठवले जाते. गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमध्ये तयार होणारे क्रिस्टल अधिक शुद्ध आणि प्रभावी असतात. या मिशनमध्ये वापरण्यात येणारे स्पेसक्राफ्ट कंपनीने स्वतः डिझाइन आणि तयार केले आहे. पहिले हे काम रॉकेट लॅब करत होती.

कंपनीचे हे मिशन अनेक अर्थाने खास आहे. जर यात यश मिळालं तर पहिल्यांदाच एखाद्या कंपनीने अंतराळात औषधे तयार करण्याचे काम होईल.

यानंतर औषधांनी भरलेले कॅपसुल 18000 मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीवर आणण्यात येईल. हे कॅप्सूल खास हिट शिल्डने कव्हर केलेले असतील. यामुळे पृथ्वीच्या वायुमंडळातील उष्णतेचा यावर काहीही परिणाम होणार नाही.

नासा करत आहे मदत
अमेरिकेची सरकारी अंतराळ संस्था नासाच्या मदतीने वर्दाने एक नवीन हिट शिल्ड मटेरियल C-PICA तयार केले आहे. पृथ्वीवर परत येताना कॅप्सूल जळून जाऊ नये यासाठी हे शिल्ड संरक्षण कवच म्हणून काम करणार आहे. या मिशनची लँडिंग ऑस्ट्रेलियातील कुनिब्बा टेस्ट रेंज येथे होणार आहे.

वर्दाला अमेरिकी एव्हिएशन एजन्सीकडून पाच वर्षांचे लायसन देखील मिळाले आहे. त्यामुळे आता कंपनी नियमितपणे आणि सातत्याने मिशन लाँच करू शकते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group