क्रिडाविश्वावर शोककळा ...! प्रो कबड्डी लीग खेळण्याचं स्वप्न राहील अधुरं ; प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू
क्रिडाविश्वावर शोककळा ...! प्रो कबड्डी लीग खेळण्याचं स्वप्न राहील अधुरं ; प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू
img
Dipali Ghadwaje
क्रिडाविश्वातून दु:खद घटना समोर आली आहे. राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकीचा मृत्यू झाला आहे. मार्चमध्ये ब्रिजेशने एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

त्यादरम्यान कुत्र्याचे पिल्लू ब्रिजेशला चावले होते. साधी जखम म्हणत त्याने याकडे दुर्लक्ष केले आणि रेबीजविरोधी लस घेतली नाही. आता तीन महिन्यानंतर, रेबीजमुळे ब्रिजेश सोळंकीचे निधन झाले आहे. 

कोण आहे ब्रिजेश सोलंकी?

उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील खुरजाच्या फरना गावचा ब्रिजेश सोलंकी रहिवासी आहेत. मार्च महिन्यामध्ये त्याने गावातील नाल्यात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवले होते. यादरम्यान त्या पिल्लाने ब्रिजेशच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला होता. किरकोळ जखम समजून ब्रिजेशने उपचार घेतले नव्हते.

काही दिवसांपूर्वी ब्रिजेशची तब्येत अचानक बिघडू लागली. सुरुवातीला ब्रिजेशचा हात सुन्न झाला, त्यानंतर त्याला अशक्तपणा वाटत होता. आजारी पडल्याने ब्रिजेशला अलीगढमधील जीवन ज्योती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेबीजची लक्षणे दिसल्यानंतर अलीगढ मेडिकल कॉलेजने ब्रिजेशवर उपचार करण्यास नकार दिला. यामुळे ब्रिजेशला मथुरा येथे नेण्यात आले.

मथुरेला ब्रिजेशवर आयुर्वेदिक उपचार सुरु करण्यात आले. पण त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. शेवटी ब्रिजेशला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी ब्रिजेशला रेबीज झाल्याचे स्पष्ट केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दिल्लीहून गावी परतत असताना वाटेतच ब्रिजेश सोलंकीचा मृत्यू झाला.

ब्रिजेश सोलंकी हा राज्यस्तरीय कबड्डीपटू होता. त्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. प्रो कबड्डी लीग २०२६ साठी ब्रिजेश तयारी करत होता. कबड्डी लीगमध्ये खेळण्याचे ब्रिजेशचे स्वप्न होते. त्याच्या निधनामुळे क्रिडा विश्वामध्ये शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group