मोठी बातमी : केमिकल फॅक्ट्रीतील स्फोटात आत्तापर्यंत ३६ जणांचा मृत्यू ; बचावकार्य सुरूच
मोठी बातमी : केमिकल फॅक्ट्रीतील स्फोटात आत्तापर्यंत ३६ जणांचा मृत्यू ; बचावकार्य सुरूच
img
Dipali Ghadwaje
तेलंगणामधील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटातील मृताची संख्या ३६ वर पोहचली आहे. सोमवारी (३० जून २०२५) सकाळी फार्मा कंपनीमध्ये स्फोट झाला होता, त्यामध्ये ३६ जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटेनेतील मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तेलगंणामधील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी दुख: व्यक्त केलेय. पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मृताच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जाहीर केलेय.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यावेळी रेवंत रेड्डी यांनी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

रेवंत रेड्डी म्हणाले की, राज्य सरकार सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत आहे. फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील फार्मा कंपनीच्या कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात मृतांची संख्या ३६ वर पोहचली आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दुर्घटनेच्या ठिकाणाहून आतापर्यंत ३१ मृतदेह हाती लागले आहे. तर ५ जणांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अद्याप रूग्णालयात ३० जणांवर उपचार सुरू आहे. दुर्घटनेला २४ तास उलटून गेलेले आहेत, पण अद्याप बचावकार्य सुरूच आहे.

पाशमिलारम एमयडीसीमधील सिगाची कारखान्याच्या रिअ‍ॅक्टर युनिटमध्ये स्फोट झाला. सोमवारी सकाळी ८.१५ ते ९.३० च्या दरम्यान रिअ‍ॅक्टरमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की १०० ते २०० फुटांवर माणसं फेकली गेली होती. स्फोट झाला त्यावेळी १०० पेक्षा जास्त कर्मचारी कंपनीत काम करत होते.

स्फोटामुळे रिअ‍ॅक्टर युनिट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बहुतांश मजूर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group