महत्त्वाची बातमी : राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार ! नेमकं काय कारण?
महत्त्वाची बातमी : राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार ! नेमकं काय कारण?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा बंद राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा शाळा बंद आंदोलनाचं हत्यार उचलण्यात आलं आहे.  

या दोन दिवसांच्या आंदोलनात राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटणार आहेत. त्यामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.

गेल्या वर्षभरात सरकारकडून वारंवार आश्वासनं देण्यात आली, मात्र अनुदानाचा टप्पा, वेतनवाढ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या अद्यापही तसंच आहेत.

2024 मध्ये सलग 75 दिवस राज्यभर आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर बैठकही झाली आणि काही निर्णय जाहीर झाले. पण 14 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेल्या GR मध्ये अनुदानाचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद असणार आहेत.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group