रुग्णवाहिका रस्त्यात फसली, गर्भवती महिलेला चिखलातून काढावी लागली वाट ; कुठे घडली घटना?
रुग्णवाहिका रस्त्यात फसली, गर्भवती महिलेला चिखलातून काढावी लागली वाट ; कुठे घडली घटना?
img
DB
भंडारा : आदिवासी वस्ती पाड्यांवर रस्त्यांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळत असते. मात्र आज हे चित्र भंडारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे. 

प्रसूती कळा आल्याने गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र, एन पावसाळ्यात गावात करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळं रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात रुग्णवाहिका फसली. यामुळे गरोदर महिलेला चिखलातूनच पायी वाट काढत जावे लागण्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले.

भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील भेद्रे खाई तामसवाडी या गावात घडली.  तुमसर तालुक्यातील भेंद्रे खाई या गावातील पवन तिवाडे यांच्या पत्नीला प्रसुती कळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे लागलीच रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन करण्यात आला. काही वेळातच रुग्णवाहिका गावात दाखल झाली. 

यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मार्गस्थ झाली. मात्र पावसाळ्याच्या दिवसात गावातील रस्त्याचे अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे सर्वत्र चिखल झालेला आहे. या चिखलात रुग्णवाहिकेचा चाक फसले होते. यामुळे चिखलात फसलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी धक्का मारून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. रुग्णवाहिका चिखलात फसून असल्याने महिलेला चिखलातून पायदळ विव्हळत वाट काढावी लागली. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group