भारीच ! मेथी आणि मूगाची आता अंतराळात शेती
भारीच ! मेथी आणि मूगाची आता अंतराळात शेती
img
दैनिक भ्रमर
शेतीचे नवनवीन प्रयोग होतच असतात. यावेळी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी शेतीचा केलेला प्रयोग चर्चेचा विषय ठरत आहे. शुभांशू शुक्ला हे चक्क अंतराळात बसून शेतीचे प्रयोग करत आहे . सध्या शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असून, त्यांच्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात शेतीबाबत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. शुभांशू यांनी मेथी आणि मूग या बियांना अंकुर फुटतानाचे फोटो घेतले असून, या बिया सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात कशाप्रकारे उगम पावतात याच्या अभ्यासासाठी त्या स्टोअरेजसाठी फ्रीझरमध्ये ठेवल्या आहेत.

धारवाड कृषी विद्यापीठातील वैज्ञानिकांचा प्रयोग ही अभ्यास मोहीम भारतातील दोन प्रमुख संशोधन संस्थांमधील सहकार्याचा भाग आहे. कर्नाटकातील कृषी विद्यापीठ येथील प्रा. रविकुमार होसामानी आणि आयआयटी धारवाड येथील डॉ. सुधीर सिद्धापुरेड्डी हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये बियांची उगम प्रक्रिया, सुरुवातीची वाढ, आनुवंशिक बदल, सूक्ष्मजैविक संवाद आणि पौष्टिक मूल्य यावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

सूक्ष्म शैवाळावरही संशोधन बियांच्या प्रयोगांशिवाय शुक्ला सूक्ष्म शैवाळावरही काम करत आहेत.अन्न, प्राणवायू आणि जैवइंधन निर्माण करण्यासाठी सूक्ष्म शैवाळाचा वापर होऊ शकतो. अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांसाठी मानव जीवन टिकवण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्त्वाचे ठरू शकतात. शुक्ला एका अन्य प्रयोगात सहा प्रकारच्या पिकांच्या बियांवरही काम करत आहेत, ज्या अनेक पिढ्यांपर्यंत वाढवल्या जाणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group