गाणं गाण्यावरून 2 लेडीसिंगर भिडल्या; बेदम हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल
गाणं गाण्यावरून 2 लेडीसिंगर भिडल्या; बेदम हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल
img
DB
सोशल मीडियावर नेहमीच महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. मुंबई लोकल किंवा मग दिल्ली मेट्रो येथे तर महिलांची हाणामारी हमखास पाहायला मिळते. बायकांना भांडण करण्यासाठी कारण नाही लागत त्या कोणत्याही कारणावरून वाद करू शकतात असं म्हणतात. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  



व्हायरल व्हिडिओमध्ये  एका मोठ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर दोन महिला आहेत. तसेच अन्य काही मान्यवर व्यक्ती आहेत. काही वेळाने कार्यक्रम सुरू होतो. आता या कार्यक्रमात आयोजकांनी एकाचवेळी दोन महिला सिंगर बोलवल्या आहेत. यातली एक सिंगर गात असताना मध्येच दुसरी महिला सिंगर देखील गाऊ लागते. दोघींची गाणी मिक्स होतात. कारण दोघीही वेगवेगळी गाणी गात असतात.

तितक्यात पाहिले गाणं गात असलेली महिला थांबते आणि दुसऱ्या महिलेला ओरडू लागते. यावर दुसरी सिंगर महिला आपण काहीच चुकीचे केले नाही अशा विचारात एटीट्यूड दाखवते. ही महिला एवढ्यावरच थांबत नाही तर पहिले गाणं गात असलेल्या महिलेच्या जोरदार कानामागे देते. याचा त्या महिलेला फार राग येतो आणि मग सुरू होते दोघींची दे दणादण हाणामारी.

दोघीही एकमेकींचे केस जोरजोरात ओढतात आणि एकमेकींना मारहाण करतात. आता यांची भांडणं सोडवणार कोण असाही प्रश्न उपस्थित होतो. काही वेळाने तेथील उपस्थित व्यक्ती दोघींच्या भांडणामध्ये पडतात आणि वाद मिटवतात.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group