आजची आषाढ अर्थातच दीप अमावस्या खास, पूजन आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
आजची आषाढ अर्थातच दीप अमावस्या खास, पूजन आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
img
Vaishnavi Sangale
हिंदू संस्कृतीत दीप अमावस्या ज्यास आषाढी अमावस्या असेही संबोधले जाते, हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो.  त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदा 24 जुलै रोजी दर्श अमावस्या आहे. दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे. श्रावणात अनेक सण, व्रत आणि उत्सव असतात, ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते. दीप पूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते.

दीप अमावस्येचे महत्त्व
महाराष्ट्र आणि कर्नाटकात आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या म्हणूनही उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व पणती, समई आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते.

दीप अमावस्येचा मुहूर्त 
प्रारंभ तिथी : 24 जुलै 2025, गुरुवार, सकाळी 7:28 वाजता

समाप्ती तिथी: 25 जुलै 2025, शुक्रवार, सकाळी 9:17 वाजता

अमृत काळ: 24 जुलै 2025, दुपारी 1:30 वाजेपासून ते दुपारी 3:00 वाजेदरम्यान असेल.

मुसळधार ! पुढील २४ तासात 'या' जिल्हयांना रेड अलर्ट

दीपपूजन
या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन, त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले  जातात. काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळही दिवे लावले जातात.दीप पूजनामुळे घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो. गोडाचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group