आश्चर्यच !  भगवान शंकराच्या मंदिरावरून 'या' दोन देशांत वाद
आश्चर्यच ! भगवान शंकराच्या मंदिरावरून 'या' दोन देशांत वाद
img
Vaishnavi Sangale
भगवान शिव यांना भारतीय खूप मानतात. उद्यापासून भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना श्रावण आहे. त्यामुळे भगवान शंकरास प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त तयारीला लागले आहे. अशातच  कंबोडिया आणि थायलँड मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हे दोन्ही शेजारी देश असून या दोन्ही देशांची 817 किलोमीटरची सीमा सामाईक आहे. ही सीमा फ्रान्सने बनविली होती आणि यावरून वाद आहेत. 
फ्रान्सने 1863 ते 1953 दरम्यान कंबोडियावर राज्य केले होते.

1907 साली फ्रान्सने दोन्ही देशांची सीमा निश्चित करतानाच एक नकाशा बनवला होता.  थायलँडने या नकाशाला विरोध केला होता कारण या नकाशानुसार 11 व्या शतकातील प्रीह विहियर मंदिर कंबोडियात दाखवले होते. युनेस्कोने हे मंदिर कंबोडियात असल्याचे म्हटले होते. हे मंदिर भगवान शंकराचे मंदिर असून ते अत्यंत प्राचीन आहे. कालांतराने या मंदिराचा वाद आंतरराष्ट्रीय कोर्टात गेला होता. 1962 साली आंतरराष्ट्रीय कोर्टाने हे मंदिर कंबोडियात असल्याचे जाहीर केले होते. हा निर्णय थायलँडने मान्य केला खरा मात्र मंदिराच्या आसपासच्या भूभागावरून वाद कायम राहिला.   

खाकीला डाग ! तो कर्त्यव्य विसरला, 'या' अधिकाऱ्याचे महिलेवर अत्याचार

यावरून कंबोडिया आणि थायलँड या दोन देशांमध्ये युद्ध पेटले असून यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.  थाई सैन्याने कंबोडियाचील लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केल्याचीही माहिती मिळते आहे.  थायलँडच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की दोन देशांच्या सीमेवर किमान 6 ठिकाणी चकमकी सुरू आहेक. या चकमकींची सुरूवात गुरुवारी सकाळी थायलँडचा सुरीन प्रांत आणि कंबोडियाच्या ओद्दार मीनची प्रांताच्या सीमेवर असलेल्या मुएन थॉम मंदिर परिसरात झाली. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group