स्वरा भास्करला फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाली मोठी चूक झाली... कारण
स्वरा भास्करला फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाली मोठी चूक झाली... कारण
img
Vaishnavi Sangale
अभिनेत्री स्वर भास्कर ही तिच्या लग्नाच्या वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत होती. मुस्लिम मुलाशी लग्न ते लग्नाच्या दिवशी सरकारी कार्यालयात  तिने वाजवलेला ढोल यामुळे तिची चांगलीच चर्चा होती. आता पुन्हा तिने केलेल्या वक्तव्याने ती चर्चेचा विषय बनली आहे. कलर्स टीव्हीचा नवा रियालिटी शो ‘पती पत्नी आणि पंगा’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. लग्नानंतर ग्लॅमर विश्वापासून पूर्णपणे दूर गेलेली स्वरा भास्कर पहिल्यांदाच फहाद अहमदशी लग्नानंतर प्रेक्षकांसमोर येत आहे. ती ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये पती फहाद अहमदसोबत सहभागी होत आहे, ज्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

‘पती पत्नी आणि पंगा’ हा बहुप्रतिक्षित रियालिटी शो मुनव्वर फारुकी आणि सोनाली बेंद्रे होस्ट करत आहेत.स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या प्रोमोमध्ये दोघे ढोल वाजवताना दिसत आहेत. स्वरा ढोल वाजवत एंट्री करताना दिसत आहे, तेव्हा फहाद अहमद म्हणतो की हिला ढोलशी इतके प्रेम आहे की, लग्नाच्या वेळी तिने सरकारी कार्यालयात ढोल वाजवला होता, ज्यामुळे लग्न लावणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाली. पतीची तक्रार ऐकून स्वरा म्हणते की, हा तर भांडण करण्याच्या मूडमध्ये आहे आणि आता तिला वाटतंय की इथे येऊन तिने चूक केली. यावर फहाद म्हणतो, “तुम्ही लोक इथे मला शांत बसू देऊ नका.” स्वरा पुन्हा म्हणते, ‘मी मोठी चूक केली.’

धक्कादायक ! जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या मित्रांनी केलं असं काही की..

या शोमध्ये अविका गौर तिचा होणारा नवरा मिलिंद चांदवानीसोबत सहभागी होत आहे. तसेच हिना खान तिचा पती रॉकी जयसवालसोबत आणि गुरमीत चौधरी पत्नी देबिना बॅनर्जीसोबत दिसणार आहे. या सर्व जोडप्यांचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group