धक्कादायक ! बायको रुसली, माहेरी गेली; रागातून पतीने केले असे काही की...
धक्कादायक ! बायको रुसली, माहेरी गेली; रागातून पतीने केले असे काही की...
img
Vaishnavi Sangale
नवरा बायकोच्या नात्यात लहान मोठ्या गोष्टीवरून वाद होतच असतात पण हे वाद विकोपाला गेले तर विषय घटस्फोटापर्यंत पोहोचतो. पण त्यापलीकडे रागातून एकमेकांच्या जीवावरच उठल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत.अशीच एक घटना पुणे येथे घडली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता चव्हाण आणि प्रेम चव्हाण या दोघा नवरा बायकोमध्ये वाद होते. त्यामुळे ममता काही दिवसांपासून पतीपासून लांब राहत होती आणि माहेरी जाण्याऐवजी विमानतळ परिसरातील खांदवेनगरमधील आपल्या मावशी रेश्मा रामेश्वर जाधव यांच्याकडे राहत होती. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रेम चव्हाण अचानक ममताच्या मावशीच्या घरी आला. 

गिरीश महाजन यांच्यावरील टीका खासदार राऊतांना भोवली, 'याठिकाणी' गुन्हा दाखल

प्रेमने ममताशी बोलण्याचा बहाणा करून वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की त्याने जवळच्या चाकूने ममताच्या गळ्यावर सपासप वार केले. यात ममताचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर प्रेम चव्हाण तेथून पसार झाला. माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासांत प्रेम चव्हाणला अटक केली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group