सुनील शेट्टीचं 'ते' वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले मला लेकीनेच फटकारलं
सुनील शेट्टीचं 'ते' वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले मला लेकीनेच फटकारलं
img
Vaishnavi Sangale
सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीच्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर त्यांनी सर्वांना सी-सेक्शनपासून वाचण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नव्हे तर पतीने त्याचं करिअर बनवावं आणि पत्नीने मुलाबाळांची देखभाल करावी, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्यांमुळे त्यांना बऱ्याच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. 

एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, “मी प्रमोशनल कार्यक्रमांदरम्यान सहसा वादग्रस्त प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. मी अशा पद्धतीचा माणूस आहे जो कधी-कधी उत्तर देऊ इच्छितो आणि मग त्यातच गडबड होते. मग घरी अथिया फटकारते, पापा, तुम्ही असं का म्हणालात? फक्त नो कमेंट म्हणा. तिचं माझ्या मुलाखतींवर विशेष लक्ष असतं. खरं सांगायचं झालं तर, मला फक्त तिचीच भीती वाटते. प्रत्येक वक्तव्यावर मुलगी अथियाचं पूर्ण लक्ष असतं आणि काही चुकीचं म्हटल्यास ती  फटकारते. 

प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य, 'त्या' विधानाचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार

“मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी-सेक्शन.. यापैकी एकाची निवड करणं हे महिलेच्या हातात नसतं. काही महिला नॉर्मल डिलिव्हरी करू शकतात, तर काहींसाठी ते शक्य नसतं. अनेकदा मेडिकल परिस्थितीमुळे डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो. आई आणि बाळ दोघांची सुरक्षा महत्त्वाची असते. सी-सेक्शन काही शॉर्टकट नाही. ही फक्त एक गरज असून ते संपूर्णपणे नैसर्गिक आहे. जरी महिला सी-सेक्शनचा पर्याय निवडत असतील तरी तो कोणत्याच अर्थाने सोपा पर्याय नाही. हा केवळ लोकांचा गैरसमज आहे”, अशा शब्दांत तिने नाव न घेता सुनील शेट्टी यांना फटकारलं होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group