धक्कादायक ! 'इथे' एटीएममध्ये पैशांच्या ऐवजी निघाला नाग, कर्मचाऱ्यांचा थरकाप
धक्कादायक ! 'इथे' एटीएममध्ये पैशांच्या ऐवजी निघाला नाग, कर्मचाऱ्यांचा थरकाप
img
वैष्णवी सांगळे
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तालुक्यातील पिंपळगाव झंजाळ या गावातील घटना चर्चेचा विषय बनली आहे. जिथे एका बँकेच्या एटीएममध्ये एक मोठा विषारी साप सापडला असून या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेहमीप्रमाणे बँकेचा कर्मचारी एटीएममध्ये कॅश लोड करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने मशीन ओपन करताच त्याला एक भला मोठा, काळसर रंगाचा साप दिसला. साप हालचाल करू लागल्याने त्याची भीती वाढली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही रिस्क न घेता तातडीने गावातील स्थानिक सर्पमित्राला संपर्क केला. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचला त्यानं आत पाहिलं असता साप खरोखरच मशीनच्या मागच्या बाजूस गुंडाळून बसलेला होता. 

शिक्षिका झाली हैवान! तिसरीत शिकणाऱ्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके, कारण होतं इतकंच की...

त्यानंतर सर्पमित्राने त्या सापाला मशीनमधून बाहेर काढलं. बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांनी सर्पमित्राची ही कारवाई मोबाईलमध्ये शूट केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 
snake |
इतर बातम्या
Join Whatsapp Group