मनोरंजनसृष्टीतून रोज नवनवीन बातम्या समोर येत असतात. आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी मोठ्या कर्ज फसवणुकीच्या प्रकरणात साऊथ स्टार एस. श्रीनिवासन या अभिनेत्याला अटक करण्यात केली आहे. श्रीनिवासन यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी एका कंपनीला 1000 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 5 कोटी रुपये घेतले. परंतू नंतर पैसे हडपले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रीनिवासनला न्यायालयाने आधीच दोनदा गुन्हेगार घोषित केले आहे. 2018 पासून एस. श्रीनिवासन फरार होते. त्यांनी हॉटेल आणि कॉर्पोरेट गुंतवणुकीच्या नावाखाली कंपनीची फसवणूक केली. कंपनीने सांगितले की, एस. श्रीनिवासन यांनी दावा केला होता की, 5 कोटी रुपयांवर 1000 कोटींचे कर्ज मिळू शकते आणि जर कर्ज मिळाले नाही तर ते 30 दिवसांच्या आत पैसे परत करतो. मात्र त्याने परत केले नाही. चेन्नईमध्ये त्याच्याविरुद्ध आणखी 6 गुन्हे दाखल आहेत.एस. श्रीनिवासनला दिल्ली पोलिसांनी चेन्नईच्या वनग्राम भागातून अटक केली.