वाचा ! फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञ सांगतात की हे पीठ आरोग्यासाठी ...
वाचा ! फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञ सांगतात की हे पीठ आरोग्यासाठी ...
img
वैष्णवी सांगळे
कंटाळा येतो तर तुम्ही पण पीठ मळताना जरा जास्त मळून फ्रीजमध्ये ठेवता का ? म्हणजे पूढच्या वेळेस हेच पीठ पुन्हा कामात येईल? काही लोकांचा दावा आहे की फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ विषारी बनते, तर काहींच्या मते त्याचं पोषणमूल्य कमी होतं. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाबद्दल अनेक समज गैरसमज आहे. जे आज आपण जाणून घेणार आहोत. 

पोषणतज्ज्ञांच्या मते, फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ विषारी बनते ही गोष्ट चुकीची आहे. फ्रिजमधील तापमान सुमारे ४ अंश सेल्सियसच्या आसपास असते, जे बॅक्टेरियांच्या वाढीस आळा घालते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवलेले पीठ सुरक्षितच असते. मात्र, यामध्ये ‘योग्य साठवण’ ही अत्यंत महत्वाची बाब आहे. 

तसेच, फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ पोषणदृष्ट्याही हानिकारक नसते. लोकांमध्ये असा गैरसमज आहे की अशा प्रकारे साठवलेले पीठ त्यातील प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक गमावते. मात्र पोषणतज्ज्ञ याला नकार देतात. त्यांच्यानुसार, या पिठातील प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर हे ताज्या पिठाइतकेच टिकून राहतात. 

हे ही वाचा ! 
रोहिणी खडसेंची पतीला वाचवण्यासाठी धडपड, 'या' मोठ्या नेत्याच्या भेटीला

काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन केल्यास धोका अजून कमी करता येतो. 
१)  पीठ हवाबंद डब्यात थोडंसं तेल लावून ठेवावं. यामुळे त्यावर कोणताही ऑक्सिडेशनचा परिणाम होत नाही आणि त्याचा ताजेपणा टिकून राहतो.
२) शक्य असल्यास, मळलेलं पीठ २४ तासांच्या आत वापरण्याचा प्रयत्न करावा.
३) पीठावर जर काळसर थर आला असेल किंवा त्याची पोत बदलली असेल तर त्याचा वापर टाळावा.
४) पीठ नेहमी फ्रिजच्या मुख्य भागात ठेवावं. फ्रिजच्या दाराजवळ ठेवणं टाळावं, कारण तिथे तापमानात चढ-उतार होत राहतो. '
इतर बातम्या
Join Whatsapp Group