दैनिक भ्रमर : शरीरातील उर्जा, ताकद आणि मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी काही पोषक घटक अगदी अनिवार्य मानले जातात. आपण नेहमीच प्रोटीन आणि कॅल्शियमबद्दल ऐकतो, पण त्याचबरोबर आणखी एक घटक आहे जो कमी प्रमाणात असला तरी त्याची कमतरता शरीरावर गंभीर परिणाम घडवू शकते. तो म्हणजे व्हिटॅमिन बी12. व्हिटॅमिन बी12 शरीरात कमी झाल्यास विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
विटामिन बी-12 कमतरतेची लक्षणे
थकवा, अशक्तपणा, हातापायांमध्ये मुंग्या येणे, त्वचा पिवळी पडणे, ॲनिमिया, नैराश्य, स्मृती कमी होणे, भूक न लागणे ,लाल जीभ, बद्धकोष्ठता, सुन्नपणा किंवा इतर विचित्र संवेदना.दृष्टीदोष, गोंधळ आणि विचार करण्यास अडचण, शरीरात झिणझिण्या येणे, नसांची ताकद कमी होणे हे देखील लक्षण यात दिसते तसेच विटामिन बी १२ रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी देखील महत्वाचे आहे.
विटामिन बी-12 च्या कमीची कारणे
पुरेसा आहार न घेणे, योग्य प्रकारचा सकस आहराचा आपण वापर करत नसलो तर शरीराचे पोषण नीट होत नाही. त्यामुळे आहार हा सकस आणि विविध्यपूर्ण असावा. पोटाच्या समस्या होत असले तर तुमच्या शरीरात बी-१२ ची कमतरता होते.
विटामिन बी-12 साठी काही उपाय
१) समुद्रातून मिळणारे अन्न हे अनेक पोषक घटकांचे उत्तम साधन असते. विशेषतः शिंपले हे त्यामधले सर्वाधिक फायदेशीर मानले जातात. फक्त तीन औंस शिजवलेल्या शिंपल्यांमध्ये सुमारे १७ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी१२ असतं, जे आपल्या रोजच्या गरजेपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.
२) जे लोक शाकाहारी किंवा वेगन आहार पाळतात त्यांच्यासाठी व्हिटॅमिन बी१२ मिळवणं थोडं कठीण होतं. पण न्यूट्रिशनल यीस्ट हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. फक्त दोन टेबलस्पून यीस्टमध्ये ८ ते २४ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी१२ असतं. याशिवाय त्यामध्ये सर्व आवश्यक अमीनो अॅसिड्स आणि भरपूर प्रोटीनही मिळतं.
३) माशांमध्ये प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स तर असतातच, पण त्याचबरोबर व्हिटॅमिन बी १२ देखील भरपूर प्रमाणात मिळतं. उदाहरणार्थ, शिजवलेल्या सॅल्मन माशाच्या तीन औंस भागामध्ये सुमारे २.६ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी१२ असतं, जे आपल्या दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त आहे. नियमितपणे मासे खाल्ल्याने रक्तनिर्मिती आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
४) दुग्धजन्य पदार्थ हे आपल्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी१२चा समावेश असतो. एका कप २% फॅट असलेल्या गायीच्या दुधामध्ये सुमारे १.३ मायक्रोग्रॅम बी१२ असतं. दहीसुद्धा या बाबतीत उत्तम ठरतं.