कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे रस्ते अपघातात निधन; पत्नीचाही मृत्यू
कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे रस्ते अपघातात निधन; पत्नीचाही मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचा आज (शनिवार) पहाटे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील मऊ परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हरेराम त्रिपाठी हे आपल्या कुटुंबीयांसह त्यांच्या मूळ गावी जात होते. ते रामटेकवरून काल रात्री सहा वाजता निघाले होते आणि सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, विद्यापीठात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा 
न्यायालयातच सरकारी वकिलाची आत्महत्या ; 'या' गोष्टीने मृत्यूचं गूढ उलगडणार !

प्रा. हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, नव्यन्याय आणि न्यायशास्त्राचे मोठे विद्वान होते. त्यांनी 7 जून 2023 रोजी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी विद्यापीठासाठी ७० कोटी रुपयांचे अनुदान मिळवले. तसेच संशोधन प्रकल्प आणि कार्यशाळांसाठीही त्यांनी अनुदान मिळवले. त्यांच्या काळात वारंगा आंतरराष्ट्रीय परिसरातील डॉ. हेडगेवार शैक्षणिक भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२५ रोजी झाले. याशिवाय संशोधन छात्रावास आणि डॉ. तोतडे सभागृह देखील त्यांच्या काळात पूर्ण झाले. त्यांनी कालच ६ प्राध्यापकांना पदोन्नतीचे पत्र दिले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group